Advertisement

​वाहतूक नियमात मोठे बदल: १ मार्चपासून दुचाकीस्वारांना बसणार २५,००० रुपयांपर्यंत दंड Traffic Chalan Rule 2026

Traffic Chalan Rule 2026: ​रस्त्यावरील शिस्त वाढवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य वाहतूक विभागाने कंबर कसली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच वाहतुकीच्या नियमांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले असून, १ मार्च २०२६ पासून याची अंमलबजावणी अत्यंत कडकपणे केली जाणार आहे. या नव्या नियमांनुसार, आता काही चुकांसाठी दंड चक्क १० पटीने वाढवण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

​सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आता दंड भरण्यासाठी तुम्हाला पोलीस अडवण्याची गरज नाही; आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे थेट तुमच्या बँक खात्यातून दंड वसूल केला जाणार आहे.

​सोने की कीमतों में गिरावट: होली के त्योहार पर खरीदारी का बेहतरीन अवसर Gold Rate Today
​सोने की कीमतों में गिरावट: होली के त्योहार पर खरीदारी का बेहतरीन अवसर Gold Rate Today

​हाय-टेक सीसीटीव्हीद्वारे होणार दंड वसुली

​आता रस्त्यांवरील हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे नियम मोडणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेट स्वस्त स्कॅन करतील. हा दंड तुमच्या गाडीच्या आरसी बुक (RC Book) वर नोंदवला जाईल. दंडाची रक्कम संबंधित वाहन मालकाच्या बँक खात्यातून ऑनलाईन कापली जाईल. जर खात्यात पैसे नसतील, तर पोलीस थेट घरी येऊन कारवाई करू शकतात.

Advertisements

​हेल्मेट आणि लायसन्सबाबत कडक तरतूद

  • हेल्मेट नसणे: पूर्वी हेल्मेटसाठी केवळ १०० रुपये दंड होता, तो आता १,००० रुपये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दंड भरून सुटका होणार नाही; तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स पुढील ३ महिन्यांसाठी निलंबित (Suspend) केले जाईल.
  • विमा आणि पीयुसी (Insurance & PUC): गाडीचा वैध विमा नसल्यास २,००० रुपये दंड आणि ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

​मोबाईलचा वापर आणि ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’

  • मोबाईलवर बोलणे: गाडी चालवताना मोबाईलचा वापर केल्यास किंवा सिग्नल तोडल्यास ५,००० रुपये दंड भरावा लागेल. मोबाईलमुळे चालकाचे लक्ष विचलित होऊन होणारे अपघात टाळण्यासाठी ही मोठी वाढ करण्यात आली आहे.
  • मद्यपान करून गाडी चालवणे: पहिल्यांदा सापडल्यास १०,००० रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवास, तर दुसऱ्यांदा सापडल्यास १५,००० रुपये दंड आणि २ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अशा वेळी पोलीस तुमची गाडी जप्त करू शकतात.

​अल्पवयीन मुलांच्या पालकांसाठी सावधान!

​पालकांसाठी हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. जर १८ वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी गाडी चालवताना आढळल्यास:

​Gold-Silver Price Today: सोने की कीमतों में भारी बदलाव, जानें आपके शहर का भाव
सोने की कीमतों में भारी बदलाव, जानें आपके शहर का भाव ​Gold-Silver Price Today
  • ​पालकांना २५,००० रुपये दंड भरावा लागेल.
  • ​पालकांना ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
  • ​संबंधित अल्पवयीन मुलाला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही.
  • ​त्या गाडीची नोंदणी (Registration) देखील एक वर्षासाठी रद्द केली जाईल.

महत्त्वाची टीप: प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या गाडीची सर्व कागदपत्रे (लायसन्स, विमा, पीयुसी) अपडेट असल्याची खात्री करा. नियमांचे पालन करणे हे केवळ दंड वाचवण्यासाठी नसून तुमच्या आणि इतरांच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी आहे.

Advertisements

किसानों के लिए बड़ी खुशखबरी, मार्च में आएगी 22वीं किस्त, ऐसे चेक करें लिस्ट PM Kisan 22nd Installment
किसानों के लिए बड़ी खुशखबरी, मार्च में आएगी 22वीं किस्त, ऐसे चेक करें लिस्ट PM Kisan 22nd Installment

Leave a Comment

Advertisements